आहारातील काही पदार्थ जे ठेवतील तुम्हाला निरोगी आणि वाढवतील तुमची रोग प्रतिकारशक्ती
आरोग्यदायी जीवनासाठी काही आहारातील पदार्थ
१ ) दही : दह्यामध्ये आपल्या शरीरास आवश्यक असलेले बॅक्टेरीया असतात . अन्नातले न्युट्रीएंट्स शोषून घेण्याचे ते काम करतात . त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते . तसेच दह्यामध्ये कॅलशियम , पोटॅशियम , प्रोटीन व व्हिटॅमिन बी असते .
२ ) लिंबू : - लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते . सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते . लिंबाचा रोज आहारात समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते . तसेच सर्दी तापापासून बचाव होतो . शरीरातील दुषितांचा निचरा होऊन रक्तही शुद्ध होते .
४ ) पालक ( Spinach ) : - पालकामध्ये व्हिटॅमिन सी व ए भरपूर प्रमाणात असतात . त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी व त्वचेवर चकाकी येण्यासाठी त्याचा उपयोग होतो . पालकामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो . तसेच अॅनिमिया या रोगासाठी खास मदत होते व स्नायूही मजबूत होतात .
५ ) वाटाणा Green pease : - हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी , ई व के मुबलक प्रमाणात असते . त्यामध्ये थोड्या प्रमाणात कॅलरीज् असतात . त्यामुळे वजन वाढलेल्यांचे वजन कमी होऊ शकते . तसेच लोह , पोटॅशियम व फॉस्फरस असते . त्यामुळे शरीराचे detoxification होते .
७ ) कोबी : - कोबी त्वचेसाठी व डोळ्यांसाठी अत्यंत उत्तम आहे . कारण त्यात व्हिटॅमिन ए आहे . कोबीची भाजी आवडत नसणाऱ्यांनी तो सलाडमध्ये कच्चा तरी जरुर खावा . स्नायूच्या विकासासाठी कोबी अत्यंत उपयुक्त आहे . तसेच फुफ्फुसे व पोटाचे आरोग्यही कोबीच्या आहारात समाविष्ट केल्याने सुधारते .
९ ) कांदा : - कांद्याचा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो अन्नपदार्थाची चव वाढवतो . पण कांद्याचा हा एकच गुणधर्म नाही , त्याचे औषधी गुणधर्मही आहेत . नियमीत कांदा खाल्याने वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमित होते व त्यामुळे हार्टअॅटॅकचा धोका कमी होतो . कांदा नियमित खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कमी होते . रक्तातल्या गुठळ्या विरघळतात , रक्त पातळ रहाते .
१० ) भोपळा : भोपल्यामध्ये विटामिन्स,मिनरल्सआणि फायबर्स असे सर्व anti oridants असतात जे आपल्याला आरोग्यपूर्ण व तरुण रहाण्यास मदत करतात .भोपळा चेहऱ्यावर लेप करून लावल्यास त्वचा मुलायम राहण्यास मदत होते . तव्चे वरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते .
११ ) टॉमॅटो : - टॉमॅटोमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स् आणि मिनरल्स् असतात . टॉमॅटो कच्चा खाल्ला काय किंवा शिजवून खाल्ला काय , तो अत्यंत न्यूट्रीशस असतो . टॉमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी सुधारते . डायबिटीस असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास मदत करते . टॉमॅटोमध्ये असलेल्या ए व सी या जीवनसत्वांमुळे पेशींचे आरोग्य सुधारते . व्हिटॅमिन बी व पोटॅशियममुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व रक्तदाबही नियंत्रित रहातो . टॉमॅटोमधील व्हिटॅमिन के व कॅल्शियममुळे , तो नियमीत आहारात ठेवल्याने हाडेही मजबूत होतात .
१२ ) लसूण ( Garlic ) : - लसूणात अलायसिन ( allian ) आणि सियोन ( cyoene ) नावाचे घटक असतात . हे घटक रोगट जंतूंची वाढ रोखतात . लसूण रसही जखमा किंवा जखमेतल्या जंतूंची वाढ रोखण्यास अतिशय उपयोगी आहे . लसणातला अलायसिन नावाचा जरासा तेलकट वास असणारा घटक जंतूनाशाला मदत करणारा ठरतो . रोज दोन किवा तीन लसूण पाकळ्या आहारात ठेवणे उचित ठरते . सर्व जगभर स्वयंपाकात लसूण वापरला जातोच . म्हणूनच रोजच्या आहारात लसणाचा सहभाग असणे योग्य . हृदयाचे कार्य योग्य चालण्यास केवळ मदत इतकेच नव्हे , तर संपूर्ण हृदयप्रक्रिया उत्तम त - हेने चालण्यास लसणाची मदत होते . रोजच्या अन्नात लसूणाचा उपयोग केल्यास रक्ताशी संबंधीत आजार कमी होण्यात मदत होते . रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास लसूण उपयोगी पडतो हे मधुमेहींना दिलासा देणारे आहे . उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लसूणाची कॅप्सूल घेतल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते . नुकत्याच केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की लसूण जंतूनाशक असल्याने दातदुखी थांबवण्यासाठी लसणाचा उपयोग होऊ शकेल . लसणाचे तेल किंवा केवळ लसणाची पाकळी दाताच्या दुखऱ्या भागावर चोळावी . सर्दी खोकल्यावरही लसूण उपयोगी ठरुन तो सशक्त शरीर रचनेसाठी आवश्यक आहे . अभ्यासात असे दिसते की लसूण रक्तातील कॅन्सर वाढवणारे घटक मर्यादित करुन ट्युमर सेल कमी करु शकतात.
१३ ) संत्री : - संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते . त्यामुळे सर्दी तापापासून ते आपल्याला वाचवते . त्याचप्रमाणे त्यामध्ये चोथा तत्व भरपूर असते . त्यामुळे अन्न पचनासाठी त्याचा उपयोग होतो . सकाळच्या न्याहारीमध्ये संत्र्याचा रस घेतल्यास वजन कमी करण्यास त्याचा उपयोग होतो . पण शक्यतो ही फळं तशीच खावीत . कारण त्यामुळे चोथाही शरीरास मिळतो व रसही मिळतो .
१४ ) द्राक्ष : - द्राक्ष काळी किंवा हिरवी कुठलीही असली तरी त्याच्यातले गुणधर्म साधारण सारखेच असतात . द्राक्षांमध्ये मँगेनीजचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास अटकाव होतो . तसेच हे खजिन हाडांना मजबूत बनवते . रक्तात सारखेचे प्रमाण नियंत्रीत ठेवते व मेंदूचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते . द्राक्षात जवळजवळ ७५ % पाणी असते . त्यामुळे ऋतुनुसार जेवणानंतर द्राक्षं जरुर खावीत . तसेच व्हिटॅमिन ए , बी , सी , ई आणि के तसेच कॅल्शियम पोटॅशियम ही आहारमूल्ये द्राक्षांत असतात . खेळाडूंना एनर्जी वाढवण्यासाठी द्राक्ष खाणे अत्यंत फायदेशीर ठरते . हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासही द्राक्षांचे सेवन केल्याने उपयोग होतो .
१५ ) सफरचंद : - An apple a day , keeps doctor away ! असं म्हटलेलंच आहे . कारण त्यात व्हिटॅमिन सी , आयर्न , पोटॅशियम , सोडीयम , फॉस्फरस , कॅल्शियम , सल्फर इत्यादी घटक असल्याने त्याचं पोषणमुल्य खूप जास्त आहे . सफरचंदाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात व आतडी मजबूत होतात . तसेच सफरचंदात चोथा तत्व भरपूर प्रमाणात असते . ते सालासकटच खावे . त्यामुळे पचनक्रिया सुधारते .
१६ ) केळे : - केळ्यामध्ये पोटॅशियम , सोडीयम , क्लोरिन , आयर्न , ग्लुकोज , अमिनो ॲसिड , इ . आवश्यक पोषण द्रव्ये आहेत . यामुळे मलावरोध , अल्सर या रोगांसाठी ते खाणे उपयुक्त ठरते . केळ्यामुळे पचनसंस्था सुधारते .
१७ ) पपई : - पपईमध्ये व्हिटॅमिन ए व ई , तसेच सिलीकॉन , पोटॅशियम , कॅल्शियम , कॉपर इत्यादी खनिजे असतात . पपईमुळे पचनकार्य सुधारते व आतडी सुदृढ होतात . मलावरोधाचा त्रास पपई खाल्याने कमी होतो . कॅन्सर , हृदयरोग , मोतीबिंदू इत्यादी रोग होण्याचा धोका कमी होतो .
१८ ) अननस : - अननसामध्ये व्हिटॅमिन बी , सी आणि ई असते . तसेच फॉस्फरस , पोटॅशियम , आयर्न इत्यादी खनिजे असतात . अननसामुळे लघवीचे प्रमाण नियमीत होते . त्यामुळे शरीरातील उत्सर्जक घटक बाहेर जाण्यास मदत होते . पचनसंस्थेचे कार्य सुधारते तसेच रक्ताभिसरण वाढते व रक्त शुद्ध होते .
१ ९ ) फणस ( Jackfruit ) :- फणसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी , ए व अॅन्डी ऑक्सीडंट्स असतात . त्यामुळे फणस खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते . त्यात पोटॅशियमही असल्याने रक्तदाब नियंत्रीत करण्यास ते मदत करते व हृदयविकार होण्यास अटकाव होऊ शकतो . चोथा तत्वामुळे पचनक्रियाही सुलभरित्या होते . नैसर्गिक साखर त्यात भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे एनर्जी मिळण्यासाठी फार उपयोग होतो . त्यात असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचे व डोळ्याचे आरोग्य टिकून रहाते . फणसाच्या बीयांमध्ये भरपूर प्रोटीन असते . त्यामुळे त्याही उकडून खाल्ल्या जातात .
२० ) आवळा : - आवळ्याला बहुगुणी म्हटले जाते . आवळ्यामध्ये जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असते . त्यामुळे शरीर मजबूत होते . दृष्टी सुधारते . तसेच केसगळती थांबून केसांची वाढही होते . त्यामुळे आवळा रोज प्रत्येकाच्या आहारात समाविष्ट असला पाहिजे . आवळा तुरट व आंबट आहे . त्यामुळे पित्त , कफ व जुलाब अशा सर्व आजारांवर ते एक गुणकारी औषध आहे . आवळ्यामुळे वार्धक्य दूर होते . त्वचा चकाकते . पचनक्रिया व्यवस्थित चालते . दात मजबूत होतात . दृष्टी सुधारते . केस काळेभोर व मुलायम , मजबूत होतात . त्याचप्रमाणे हृदयरोग , मधुमेह , सर्दी खोकला , स्वप्नदोष , श्वेतपदर इत्यादी आजारांवरही उपायकारक आहे . स्मरणशक्ती वाढते व बुद्धी तल्लख होते . आवळा कुठल्याही स्थितीत खाल्ला तरी चालतो . कारण आवळा कापला , चिरला किंवा त्याची पावडर केली तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत . थोडक्यात काय तर खूप आजारांवर आवळा हे गुणकारी औषध आहे .
२१ ) अंजिर ( Fig ) : - अंजीर जरी ऋतुनुसार मिळणारे फळ असले तरी सुक्या मेव्यांच्या रुपात ते आपल्याला वर्षभर मिळते . त्यामध्ये ए व बी ही व्हिटॅमिन्स् व फॉस्फरस , कॅल्शियम , लोह , मँगेनिज इत्यादी खनिजे असतात . अंजिरात असलेल्या चोथा तत्वामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते . हाडांना मजबूती येते . रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत रहाते . अंजिरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्याने Anemia ( पंडूरोग ) या रोगावर ते उपायकारी ठरते . अंजिर आहारात समाविष्ट केल्याने थकवा नाहीसा होतो . तसेच मेंदू तल्लख होण्यास मदत होते . अंजिर कुस्करुन त्वचेवर लावल्याने त्वचाही तजेलदार होते व तारुण्य पिटीकांवरही एक उत्तम इलाज म्हणून ते उपयोगी आहे .
२२ ) तुळस ( Basil ) : - तुळशीला वनौषधी म्हटले जाते . त्यामध्ये व्हिटॅमिन ए असते . आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे खूप फायदे आहेत . सकाळी उठल्यावर ताजी तोडलेली तुळशीची दोन - तीन पाने रोज चावून खावीत . त्यामुळे सर्दी - तापापासून लांब रहाता येते व कोलेस्ट्रॉलही योग्य होण्यास मदत होते . घश्याचे कुठलेही विकार असतील तर तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी थोड्या थोड्या वेळाने घोट घोट प्यावे किंवा त्या पाण्याने गुळण्या कराव्यात . त्याचप्रमाणे रक्तशुद्धीचे महत्वाचे कार्यही तुळस करते . तुळशीची पाने वाळवून त्याची पावडर करुन ठेवावी . त्याने दात साफ करावेत . त्यामुळे दातांचे आरोग्य सुधारते .

२३ ) कोरफड ( Aloe vera ) : - कोरफड ही शारीरिक आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या , केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे . कोरफडीमध्ये ए , बी , सी आणि के इत्यादी व्हिटॅमिन्स् तसेच कॅल्शियम , मॅग्नेशियम , पोटॅशियम , कॉपर , सोडीयम , झिंक इत्यादी खनिजे असतात . त्यामुळे आपल्या शरीराची सर्व कार्य सुरळीत चालण्यासाठी तिचा उपयोग होतो . तसेच डायबिटीस असणाऱ्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास ती उपयुक्त ठरते . कोरफडीचा रस दातांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे . कोरफडीचा गर चेहऱ्याला व केसांना लावल्यास त्यांचेही आरोग्य सुधारुन त्वचा चकाकते व केस गळती थांबून केसांची वाढही होते . कोरफडीचा रस सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व रोगप्रतिकारकशक्तीही वाढते .
























Comments
Post a Comment