सूर्य नमस्कार : माहिती, कृती आणि लाभ
🌞 सूर्य नमस्कार 🙏 सूर्य नमस्कार : - हा एक सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे . या मध्ये बारा स्थिती असतात . ह्या स्थितीमुळे एकाच व्यायामप्रकारात शरीराच्या जवळ जवळ सर्व अवयवांना व्यायाम मिळतो . सूर्यनमस्कारासाठी सूर्योदयाची वेळ ही सर्वात योग्य म्हणून सांगितली गेली आहे . सूर्योदयाच्या वेळची कोवळी किरणे शरीरावर पडणे आवश्यक असते . आजकालच्या फ्लॅट पद्धतीमध्ये ते शक्य नाही , निदान एक वेळ तरी शक्य असेल तर पाळायला हरकत नाही . सूर्यनमस्काराच्या बारा स्थितीमध्ये पहिली आणि बारावी स्थिती ही नमस्काराची स्थिती आहे . पण मधल्या १० स्थिती ह्या दहा आसने आहेत . निरोगी माणसाने कमीतकमी १२ सूर्यनमस्कार करणे अपेक्षित आहे . फक्त पहिल्या दिवशी शक्य नसल्यास तीनच सूर्यनमस्कार करावेत . हळूहळू संख्या वाढवत न्यावी . सूर्यनमस्कार करताना प्रत्येक नमस्काराबरोबर सूर्याचे एक नाव घेऊन सूर्यनमस्कार घालावा . सूर्यनाम : - १ ) ॐ मित्राय नमः २ ) ॐ रवये नमः ३ ) ॐ...